अर्धवट कामे, बंद पथदिवे आणि खड्ड्यांनी भरलेले रस्ते – नागरिक त्रस्त, प्रशासन गप्प!
परिसरातील राहिवाशांनी वंचित बहुजन आघाडी बरोबर आंदोलनात सामील होण्याचा इशारा दिला.

प्रतिनिधी – विजय धों. गायकवाड
बदलापूर पश्चिमेकडील वालिवली नाका ते मांजर्ली दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून दिसेनासे होतात आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे दुचाकीस्वार, पादचारी, महिला आणि वृद्ध नागरिक यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापाऱ्यांची प्रचंड वर्दळ असते. पण प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी काही आठवड्यांपूर्वी औपचारिक उद्घाटन करून १५ दिवसांत काम पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, उद्घाटनानंतर काहीच हालचाल झालेली नाही. कामास सुरुवातही झालेली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

हे आश्वासन केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी दिले गेले होते, अशी टीका होत आहे. रस्त्याच्या कडेला पूर्वी बांधलेला फुटपाथ देखील एका पाइपलाइनच्या कामासाठी उखडून टाकण्यात आला असून, तो अजूनही तसाच पडून आहे. साहिल हॉटेलच्या दिशेने रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा खोदलेला असून, त्या कामामुळे संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे.

या सगळ्याच्या जोडीला अजून एक गंभीर समस्या म्हणजे एरंजाड ते वालीवली नाका या उल्हास नदीवर असलेल्या रस्त्याची. या रस्त्याची अवस्था अजून भयानक आहे. हा संपूर्ण मार्ग पूर्णपणे नांगरून टाकण्यात आला असून, तिथे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. मुरबाड-कल्याण हायवेवर जाणाऱ्या या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी जाणं म्हणजे अंधारात मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं आहे. कारण या मार्गावरील पथदिवे पूर्णतः बंद आहेत. दिवसा खड्डे आणि रात्री अंधारामुळे काहीच न दिसल्याने हा रस्ता अपघाताचा आणि धोक्याचा केंद्रबिंदू ठरतो आहे.या सगळ्या अनागोंदीसाठी जबाबदार कोण? नगरपरिषद आणि संबंधित विभागांनी कोणत्या नियोजनाअंती हे कामे सुरू केली? कोणत्या आधारावर खड्डेखोद परवानग्या दिल्या? कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ते उखडले जातात, पाइपलाइनचे अर्धवट कामे रस्त्याच्या मध्यभागी राहतात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पूर्णतः दुर्लक्षित होतो.
या परिस्थितीचा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून लवकरच प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून, जर तात्काळ कारवाई झाली नाही तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.वालिवली ते मांजर्ली आणि एरंजाड ते वालीवली नाका रस्ता बनला मृत्यूचा सापळा!अर्धवट कामे, बंद पथदिवे आणि खड्ड्यांनी भरलेले रस्ते – नागरिक त्रस्त, प्रशासन गप्प!बदलापूर प्रतिनिधी – विजय धों. गायकवाडबदलापूर पश्चिमेकडील वालिवली नाका ते मांजर्ली दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांनी भरलेला असून, पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून दिसेनासे होतात आणि त्यामुळे अपघाताचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे दुचाकीस्वार, पादचारी, महिला आणि वृद्ध नागरिक यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापाऱ्यांची प्रचंड वर्दळ असते. पण प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी काही आठवड्यांपूर्वी औपचारिक उद्घाटन करून १५ दिवसांत काम पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, उद्घाटनानंतर काहीच हालचाल झालेली नाही. कामास सुरुवातही झालेली नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. हे आश्वासन केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी दिले गेले होते, अशी टीका होत आहे. रस्त्याच्या कडेला पूर्वी बांधलेला फुटपाथ देखील एका पाइपलाइनच्या कामासाठी उखडून टाकण्यात आला असून, तो अजूनही तसाच पडून आहे. साहिल हॉटेलच्या दिशेने रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा खोदलेला असून, त्या कामामुळे संपूर्ण रस्त्याची चाळण झाली आहे.या सगळ्याच्या जोडीला अजून एक गंभीर समस्या म्हणजे एरंजाड ते वालीवली नाका या उल्हास नदीकाठी असलेल्या रस्त्याची. या रस्त्याची अवस्था अजून भयानक आहे.
हा संपूर्ण मार्ग पूर्णपणे नांगरून टाकण्यात आला असून, तिथे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. मुरबाड-कल्याण हायवेवर जाणाऱ्या या रस्त्यावरून रात्रीच्या वेळी जाणं म्हणजे अंधारात मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं आहे. कारण या मार्गावरील पथदिवे पूर्णतः बंद आहेत. दिवसा खड्डे आणि रात्री अंधारामुळे काहीच न दिसल्याने हा रस्ता अपघाताचा आणि धोक्याचा केंद्रबिंदू ठरतो आहे.या सगळ्या अनागोंदीसाठी जबाबदार कोण? नगरपरिषद आणि संबंधित विभागांनी कोणत्या नियोजनाअंती हे कामे सुरू केली? कोणत्या आधारावर खड्डेखोद परवानग्या दिल्या? कोणतीही पूर्वसूचना न देता रस्ते उखडले जातात, पाइपलाइनचे अर्धवट कामे रस्त्याच्या मध्यभागी राहतात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पूर्णतः दुर्लक्षित होतो.या परिस्थितीचा जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून लवकरच प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून, जर तात्काळ कारवाई झाली नाही तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.बदलापूर शहरातील नागरी समस्या केवळ रस्त्यांपुरत्या मर्यादित नाहीत. पावसाळ्यात उघड्या गटारांतून पाणी रस्त्यावर साचतं, लाईट अनेक तास जातो, पाणीपुरवठा अपुरा आहे, आणि तरीही नागरिकांकडून मुंबई महापालिकेच्या धर्तीवर प्रॉपर्टी टॅक्स वसूल केला जातो. पण नागरी सुविधा मात्र शून्य.सत्ताधारी पक्ष आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत शोबाजी करतात, मोर्चे काढतात, मात्र प्रत्यक्षात जनतेच्या समस्या जशाच्या तशा राहतात.

या परिस्थितीत बदलापूरच्या जनतेने आता फसव्या आश्वासनांना बळी न पडता, खऱ्या जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाच्या मागे उभं राहण्याची गरज आहे, असं आवाहन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अशोक गवई यांनी केलं आहे.ही परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाने तात्काळ रस्त्यांची डागडुजी, पथदिवे सुरू करणे आणि नियोजनबद्ध कामांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अन्यथा हे रस्ते आणखी जीवघेणे ठरणार आणि त्याचे संपूर्ण उत्तरदायित्व प्रशासनावर राहील.बदलापूर शहरातील नागरी समस्या केवळ रस्त्यांपुरत्या मर्यादित नाहीत. पावसाळ्यात उघड्या गटारांतून पाणी रस्त्यावर साचतं, लाईट अनेक तास जातो, पाणीपुरवठा अपुरा आहे, आणि तरीही नागरिकांकडून मुंबई महापालिकेच्या धर्तीवर प्रॉपर्टी टॅक्स वसूल केला जातो.
पण नागरी सुविधा मात्र शून्य.सत्ताधारी पक्ष आणि विरोधक एकमेकांवर आरोप करत शोबाजी करतात, मोर्चे काढतात, मात्र प्रत्यक्षात जनतेच्या समस्या जशाच्या तशा राहतात. या परिस्थितीत बदलापूरच्या जनतेने आता फसव्या आश्वासनांना बळी न पडता, खऱ्या जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाच्या मागे उभं राहण्याची गरज आहे, असं आवाहन आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते अशोक गवई यांनी केलं आहे.ही परिस्थिती लक्षात घेता, प्रशासनाने तात्काळ रस्त्यांची डागडुजी, पथदिवे सुरू करणे आणि नियोजनबद्ध कामांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. अन्यथा हे रस्ते आणखी जीवघेणे ठरणार आणि त्याचे संपूर्ण उत्तरदायित्व प्रशासनावर राहील.



