5.3 C
New York

Buy now

spot_img

लखमापुरी शाळेत निरोप व स्वागत समारंभ उत्साहात

रामकिसन अवधूत (प्रतिनिधी) :
लखमापुरी शाळेत शिक्षिका श्रीमती शेळके मॅडम यांचा निरोप समारंभ तसेच नव्याने रुजू झालेल्या श्रीमती बागल मॅडम यांचा स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुखापुरी शाळेचे केंद्रप्रमुख श्री. ए. बी. पटेकर, सुखापुरीचे केंद्रीय मुख्याध्यापक श्री. मुंजाळ, लखमापुरीचे सरपंच श्री. ज्ञानेश्वर तारगे, उपसरपंच श्री. सुनिल गाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अतुल गाडे, उपाध्यक्ष श्री. रवि कांबळे तसेच बेलगावचे मुख्याध्यापक श्री. पावसे, श्रीमती जाधव मॅडम, श्रीमती बागल मॅडम, श्री. हनुमंत जाधव सर आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री. किशोर कांबळे, श्री. रामकिसन अवधूत, श्री. सुखदेव कासार, श्री. विष्णू महागोविंद, श्री. अनिल कांबळे, श्री. विठ्ठल मामा कदम, श्री. संतोष तारगे, श्री. मच्छिंद्र काळे, श्री. महादु कामठे, श्री. नारायण निकाळजे, श्री. सचिन कामठे, श्री. कुलदीप कवडे, श्री. भरत शिंदे, श्री. अनिरुद्ध रेंगे, श्री. विक्रम कासार, श्री. कैलास भापकर आदी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. खरमाटे सर यांनी केले तर आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री. जोगी सर यांनी केले.

रामकिसन अवधूत (प्रतिनिधी)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com