-2.7 C
New York

Buy now

spot_img

मागासवर्गीय विद्यार्थ्याकडून प्रवेश शुल्क आकारल्यास प्राचार्यावर ऑट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल होणार .वैभव गिते…

प्रकाशपर्व न्यूज नेटवर्क [संपादकीय]

जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याशी माझी चर्चा झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी सोलापूर यांनी सर्व र्प्राचार्य/ अधिष्ठाता/ कनिष्ठ /वरीष्ठ /व्यवसायिका ‘तांत्रिका बिगर व्यवसायिक महाविद्यालये यांना अनुसूचित जातीच्या कोणत्याही विद्यर्थयाकडून कसल्याही प्रकारची फी वसूल करूनये आणि मागितल्याची तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी सर्व महाविद्यालयांना दिलेला आहे.

आम्ही नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस [एन.डी.एम.जे] संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त व इतर मागासवर्गीय

विद्यार्थ्याकडून शाळा महाविद्यालय भरमसाठ फी आकारात आहेत. अशी तक्रार जिल्हाधिकारी व संबंधित कार्यालय प्रमुखांकडे केलेआहे.याची दखल घेऊन जिल्हाधिकारी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी यांनी आदेश काढलेले आहेत.त्यामुळे आम्ही सोलापूर जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे आभारी आहोत.

असा आदेश संपूर्ण महाराष्ट्रसाठी काढावा यासाठी मंत्रालय स्तरावरचा पाठपुरावा सुरू असून लवकरच महाराष्ट्रतील सर्व जिल्ह्यांमध्ये हा आदेश लागू होईल. असे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉरे जस्टीस या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्रराज्य सचिव वैभवजी गीते यांनी सांगितलेअशी माहीती नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस प्रसिद्धीप्रमुख संदेश भालेराव यांनी दिली

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com