5.3 C
New York

Buy now

spot_img

ढोके दापिवली जिल्हा परिषद शाळेत लोकराजा शाहू महाराज जयंती “सामाजिक समता न्याय दिन” म्हणून उत्साहात साजरी

बदलापूर – विजय धों. गायकवाड

आरक्षणाचे जनक, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते आणि लोकहितदक्ष लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ढोके दापिवली जिल्हा परिषद शाळेत दि. २६ जून रोजी भव्य आणि उत्साही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. पूजनाचा मान शाळा व्यवस्थापन समितीच्या नव्याने निवडून आलेल्या अध्यक्षा सौ. अश्विनीताई महेश गायकर व उपाध्यक्षा सौ. शालीनीताई हिरामण माळी यांना देण्यात आला. यानंतर दीपप्रज्वलन व अगरबत्तीने वातावरण सुगंधीत करण्यात आले.

शाळेतील नवोपक्रमशील शिक्षक श्री. आनंद सोनकांबळे सर यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर अभ्यासपूर्ण विवेचन करत त्यांच्या शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक कार्याचा परामर्ष घेतला.

मुख्याध्यापक श्री. शंकर झाडबुके सर, सेवा जेष्ठ शिक्षक श्री. पांडुरंग पाटील सर आणि नवनियुक्त शिक्षक श्री. संदीप मिसाळ सर यांनी देखील आपल्या विचारांद्वारे शाहू महाराजांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले.

याच निमित्ताने इ. ४ थी व इ. ५ वी वर्गासाठी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी बचत बँकेची स्थापना करण्यात आली.

याशिवाय सर्व विद्यार्थ्यांना पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमात ढोके दापिवली शाळा व्यवस्थापन समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. अश्विनीताई गायकर व उपाध्यक्षा सौ. शालीनीताई माळी यांचा सत्कार स्वयंसेवक शिक्षिका सौ. राखी भोईर मॅडम व श्रीमती रत्ना शिसवे मॅडम यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि पेन देऊन केला.

कार्यक्रमाच्या अखेरीस “छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, सामाजिक समता दिनाचा विजय असो!” अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे शतशः आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com