-2.7 C
New York

Buy now

spot_img

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त गडपिपरी येथे भव्य कार्यक्रम

गडपिपरी (ता. चिमूर, जि. चंद्रपूर) – छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा, ग्राम शाखा, गडपिपरी यांच्या वतीने 26 जून 2025 रोजी बुध्द विहार परिसरात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भीमराव रामटेके, अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, ग्राम शाखा, गडपिपरी यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डाॅ. बाळासाहेब बन्सोड, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, प्रकाश पर्व न्यूज हे उपस्थित होते.

विशेष मार्गदर्शक म्हणून अमिना रामटेके, अध्यक्षा, भारतीय बौद्ध महासभा, गडपिपरी, व आदरणीय फुलचंद पाटील, सरचिटणीस, भारतीय बौद्ध महासभा, गडपिपरी हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन मिलिंद पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक आ. फुलचंद पाटील यांनी सादर केले. यावेळी डॉ. बाळासाहेब बन्सोड यांनी उपस्थितांना छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रफुल्ल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्राम शाखेतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व पुरुष यांनी परिश्रम घेतले.प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी : डॉ . बाळासाहेब बन्सोड

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com