8.4 C
New York

Buy now

spot_img

सोन्नाथडी ग्रामपंचायत अंतर्गत विकासकामांना गती; दलित वस्तीसाठी ४८ लाखांचा निधी मंजूर करण्याचा आश्वासन

प्रतिनिधी: राज वाघमारे, बीड जिल्हा

सोन्नाथडी, ता. माजलगाव, जिल्हा बीडगावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या सोन्नाथडी ग्रामपंचायतीने १५व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर झालेल्या विविध विकासकामांना प्रत्यक्षात गती दिली आहे. गावातील पेव्हर ब्लॉक, सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली बांधकाम यांसारख्या कामांची सुरुवात जलद गतीने करण्यात आली असून, ग्रामस्थांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.

ग्रामपंचायतीचे सरपंच केरबा तपसे यांनी प्रकाशपर्व न्यूजशी बोलताना सांगितले की,

> “या वर्षी गावाच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून १५व्या वित्त आयोगाचा निधी संपूर्णपणे वापरण्यावर भर राहील. शिवाय इतर शासकीय योजनांतूनही निधी आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत.”

विशेष म्हणजे, दलित वस्तीसाठी ४८ लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला असून, त्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये पाणीपुरवठा, रस्ते बांधकाम, स्वच्छता व्यवस्था अशा अत्यावश्यक गरजांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

सरपंच तपसे पुढे म्हणाले,

> “दलित वस्तीत राहणाऱ्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रत्येक छोट्या-मोठ्या समस्येकडे वैयक्तिक लक्ष देण्यात येईल. कामांच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.”

गावात सुरू असलेल्या कामांमुळे ग्रामस्थांमध्ये आश्वासक वातावरण निर्माण झाले असून, येणाऱ्या काळात सोन्नाथडी हे ‘आदर्श ग्राम’ म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com