प्रतिनिधी – प्रकाश गवारे , नांदेड जिल्हा
मुंबईतील राजगृह येथे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी एक गंभीर मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकार आणि RSS वर थेट आरोप केला.
बाळासाहेब आंबेडकर म्हणाले, “RSS चे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे AK-47 व टॉमी गन सारख्या शस्त्रांची पूजा करतानाचे फोटो सध्या सार्वजनिक झाले आहेत. हे अत्यंत धक्कादायक आहे.”
ते पुढे म्हणाले, “भारतीय लष्करात देखील ही शस्त्रे वापरण्याची परवानगी विशिष्ट प्रशिक्षित जवानांनाच असते. मग RSS सारख्या निजी संघटनेकडे अशी युद्धजन्य शस्त्रे कशी आली? याचे उत्तर देशाला दिले गेले पाहिजे.”

बाळासाहेबांनी सरकारला थेट प्रश्न विचारला – “जेव्हा सामाजिक कार्यकर्ते किंवा विचारवंतांवर ‘अर्बन नक्षल’चा ठपका ठेवून अटक केली जाते, तेव्हा RSS वर कारवाई का केली जात नाही? सरकारकडे हिम्मत आहे का?”
या पत्रकार परिषदेमुळे राज्य व देशाच्या राजकारणात नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.