
सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दिनांक १५ जुलै २०२५ बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विरा फाऊंडेशनच्या माध्यमातून दलित पँथर चळवळीत योगदान देणाऱ्यांचा सन्मान कालकथित धम्मानंदजी मुंडे यांच्या स्मरणार्थ ‘समाजभूषण’ पुरस्कार देवून गौरविण्यात येणार असल्याची माहिती विरा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राहुल घोबाळे यांनीएका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. विराट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आयु. राहुल घोबाळे यांच्या संकल्पनेतून हा सन्मान सोहळा साजरा होणार असून, परळी वैजनाथ शहरातील फुले- शाहू -आंबेडकर चळवळीतील दलित पँथरमध्ये योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच,हयात नसलेल्यांच्या कुटुंबियांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
समाजभूषण पुरस्कारांमध्ये नामदेव रोडे ,बाबुराव दिनाजी साळवे , हरिभाऊ कोंडीबा बनसोडे , निळकंठ मुंजाजी धाटे, प्राध्यापक दासू वाघमारे ,गंगाधर बळीराम रोडे ,सीमाताई कांबळे, रामलिंग आप्पा सुगरे भास्कर नाना रोडे ,राम हरिभाऊ वाव्हळे ,विश्वनाथ सिताराम गायकवाड, सोपान भिमराव ताटे ,अनिल जगन्नाथ मस्के , माधव ताटे, भिमराव लक्ष्मण मुजमुले, सुभाष वाघमारे, लक्ष्मण वैजनाथ आदोडे, राजेभाऊ मुंजाजी रोडे, गौतम शंकर आगळे, सुधाकर सुर्यवंशी,राम किरवले, अनंत दहिवडे, मधुकर किरवले, केरूबाई कांबळे, महादेव वाव्हळे, नारायण रायभोळे, रवी मुळे आदींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.तर मरणोत्तरांत वसंत लिंबाजी जाधव, प्रल्हाद ताटे, राम लांडगे, श्रीरंग चिकाटे, विठ्ठल आमले,एम.सी.ताटे, मुक्ताबाई रोडे, श्रावण रोडे, देविदास भद्रे, जयसिंग भद्रे,कचरुबा गायकवाड,संदिपान मस्के, शांताबाई रोडे,जबोभाई पठाण, संतराम सरवदे, गजानन रोडे, अर्जून देवडे, संतराम ताटे, विजयकुमार गंडले, पांडुरंग गायकवाड, बाळकृष्ण रोडे, हाबीबभाई कच्छी, अकबर काकर, सोजराबाई भोकरे, लक्ष्मीबाई रायभोळे, बालाजी रायभोळे आदींच्या कुटुंबातील सदस्यांना देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदरील पुरस्कार हा दिनांक ११/८/२०२५ रोजी विरा फाउंडेशन च्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात येणार असून, या कार्यक्रमाला फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक सुरेश रोडे, सुनील कांबळे, मनोहर मुंडे, बाबा कांबळे ,शरण मस्के ,धम्मा क्षिरसागर, राहुल पैठणे, रंजित नाना सरवदे, अभिषेक आचार्य आदींनी केले आहे.