अकोला | प्रतिनिधी | शेख हसन .
संविधानाच्या चौकटीत राहून ऐतिहासिक आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अलीकडेच काही तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांनी भ्याड हल्ला करत काळे फासल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आणि इतर सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, “प्रवीण दादा यांनी आजवर छत्रपती शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार घेऊन सामाजिक चळवळीचे काम करत बहुजन तरुणांना रोजगार व वैचारिक दिशा दिली आहे. त्यांचे विचार पटोत वा न पटोत, त्याला हिंसक विरोध करणे हे लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्त्वांचा अपमान आहे.
“संघटनांनी पुढील मागण्या मांडल्या :सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.अशा घटना पुन्हा महाराष्ट्रात घडू नयेत यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी.सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या अशा घटनेत सहभागी गुन्हेगारांवर तातडीने कायदेशीर कारवाई व्हावी.”जर याची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई झाली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रभर बहुजन समाज रस्त्यावर उतरेल,” असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व सम्राट अशोक सेनेचे राज्य कार्याध्यक्ष आकाश दादा शिरसाट आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी महापुरुषांच्या जय घोषासह प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला.
