5.3 C
New York

Buy now

spot_img

नेपाळसारखी परिस्थिती भारतात टाळण्यासाठी भ्रष्टाचार थांबवणे गरजेचे” – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

प्रकाशपर्व कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव

दिनांक 12/09/2025 मुंबई :नेपाळ व बांगलादेशात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीवरून भारतातही अशीच स्थिती उद्भवणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. याबाबत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

ते म्हणाले, “शासनाने सतर्क राहिले पाहिजे. भ्रष्टाचार वाढू लागला आहे, तो थांबवणे गरजेचे आहे. नेपाळच्या न्यायव्यवस्थेची इमारत जाळण्यात आली, हा भारतीय व्यवस्थेसाठीही इशारा आहे. न्यायव्यवस्थेतील जी केंद्रे आहेत, त्यांनी सावध राहून सामान्य माणसांच्या प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. अन्यथा, जनतेचा संयम सुटू शकतो.”अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले की, जनतेचे प्रश्न सोडवले गेले, तर भारतात नेपाळसारखी परिस्थिती उद्भवणार नाही.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com