-2.7 C
New York

Buy now

spot_img

विद्यार्थ्यांना चांगल्या सवयींचा मोलाचा सल्ला देत गणू महाराजांचे अल्पोपहार वाटप तसेच वृक्षारोपण

तालुका प्रतिनिधी विजय अहिरे

म्हसदी (प्रतिनिधी):
गावाचे वैभव, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित व्यक्तिमत्व गणू महाराज यांच्या हस्ते जिल्हा परिषद केंद्र शाळा म्हसदी येथे अल्पोपहार वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला.

बालवाडी तसेच इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलामुलींना अल्पोपहारासोबतच विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी यासाठी गोळ्यांचेही वाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले, “विद्यार्थ्यांनी दररोज अंघोळ करावी, स्वच्छ कपडे परिधान करावेत, नखे स्वच्छ ठेवावीत व चांगल्या सवयी अंगीकाराव्यात,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.

गणू महाराज हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्यविषयक अनेक उपक्रम राबवत असून, आपल्या उत्पन्नातील तब्बल ९० टक्के हिस्सा दान करतात, असे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांचे वर्णन जगदीश ह्याळीस सर यांनी गौरवोद्गारातून केले. तसेच मोती सर आणि देवेंद्र देवरे सर यांनी महाराजांचे आभार मानले.

या प्रसंगी भाजपा साक्री तालुका उपाध्यक्ष कुणाल भदाणे, आबासाहेब देवरे, पंकज जाधव, प्रकाश देवरे, रोहित देवरे, नरेंद्र निकम, निलेश देवरे, युसुफ पिंजारीअंगणवाडी सेविका यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावाच्या प्रगतीसाठी सतत झटणारे आणि मुलांप्रती जिव्हाळा बाळगणारे गणू महाराज यांचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com