-2.7 C
New York

Buy now

spot_img

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना भूमिका अस्पष्ट – आरक्षणाच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडी ठाम युवा नेते सुजात आंबेडकर

प्रकाशपर्व न्युज पोर्टल – धम्मपाल शिंदे पुणे व लातूर जिल्हा प्रतिनिधी

जेव्हा फडणवीसांनी मराठा आरक्षण दिल्याचे भासवणारे बॅनर लावले, तेव्हा रोहित पवारांनी विचारले की पैसे कुठून आले?पण आम्हाला माहिती आहे की, राज्यभर बॅनर लावण्यासाठी फडणवीसांना पैसे कुठून मिळाले. कारण भाजप आणि राष्ट्रवादी यांनी जनतेचा पैसा लुटून खाल्ला आहे.

भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना उभाठा, राष्ट्रवादी शरद पवार – हे सगळे मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट का करत नाहीत? हा आमचा प्रश्न आहे.फडणवीस म्हणतात की भाजपा हा ओबीसींचा पक्ष आहे, त्यांचा डीएनए ओबीसी आहे. पण ओबीसींच्या कोट्यातून कागदावर मराठा आरक्षण देण्याचं काम फडणवीसांनीच केले आहे.

मराठा आरक्षणाला सर्व पक्ष पाठिंबा देत आहेत, पण ते ओबीसींच्या ताटातून दिलं जात आहे यावर मात्र कोणीही बोलायला तयार नाही. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये.ही ठाम भूमिका घेणारा वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com