-1.3 C
New York

Buy now

spot_img

गुणवंत विद्यार्थ्यांचा बाभळगाव शाळेत सत्कार

प्रतिनिधि = राज वाघमारे प्रकाशपर्व न्यूज

बाभळगाव (ता. पाथरी) | 23 सप्टेंबर

येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. विविध शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.

चि. रोहित अशोकराव रणेर याची निवड महापारेषण विभाग, नांदेड येथे विद्युत सहाय्यक पदावर झाली असून, कु. गायत्री मुंजाभाऊ रणेर हिने BAMS साठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर येथे प्रवेश मिळवला आहे. तर कु. भक्ती बाबासाहेब रणेर हिची निवड B.Sc. Agri साठी नांदेडच्या कृषी महाविद्यालयात झाली आहे.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या आई-वडिलांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व शुभेच्छापत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com