प्रकाश पर्व न्यूज मीडिया
आवाज वंचित बहुजन समाजाचा
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी: रितेश साबळे
ठिकाण: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
दिनांक: १९ जून २०२५ .
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कर्णापूरा गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. १५ वर्षीय प्रणव गौतम मोरे या अल्पवयीन मुलाचा मृतदेह गावातीलच एका विहिरीत आढळून आला असून, त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मुलगा रविवार दुपारी (१५ जून) रोजी शेळ्या चारण्यासाठी बाहेर गेला होता. परंतु संध्याकाळपर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. काही वेळाने चव्हणी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
यानंतर सोमवार (१७ जून) रोजी सकाळी गावातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासणीत गळ्यावर तसेच शरीरावर मारहाणेचे खुणा आढळून आल्याने घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात मृताच्या नातेवाईकांनीही हत्या झाल्याचा ठाम संशय व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, नागरिकांनी न्यायासाठी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. चव्हणी पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा गंभीरतेने तपास करत असून, मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे .
प्रकाश पर्व न्यूज मीडिया तुमच्यापर्यंत नेहमीच वंचितांचे आणि सामान्य जनतेचे सत्य पोचवत राहील.



