-1.3 C
New York

Buy now

spot_img

पावसामुळे शेतकरी हतबल; टाकळी खोजबोळ (ता. बाळापूर) येथे दुबार नव्हे तर तिसऱ्यांदा पेरणीची वेळ

टाकळी खोजबोळ, ता. बाळापूर (जि. अकोला) – मागील तीन दिवसांपासून झालेल्या सततच्या पावसामुळे टाकळी खोजबोळ गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गावातून वाहणारी पान कास नदी आणि परिसरातील नाल्यांनी जोर धरल्याने अनेक शेतांची माती वाहून गेली असून पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.

गावातील काही शेतकऱ्यांनी याआधीच दुबार पेरणी केली होती. मात्र, आता या अनियमित पावसामुळे त्यांना तिसऱ्यांदा पेरणी करावी लागणार आहे. शेतात उभ्या असलेल्या पिकांचे मुळे सुद्धा वाहून गेल्याने जमिन पुन्हा नांगरावी लागणार आहे.

शेतकऱ्यांच्या या संकटाकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावे, पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच तिसऱ्या पेरणीसाठी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे .

प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा
शेगाव प्रतिनिधी : शेख हसन .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com