5.3 C
New York

Buy now

spot_img

सुखापूरी येथे कृषी सेवा केंद्राच्या मनमानीला शेतकरी वैतागले; तालुका कृषी अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका

सुखापूरी (ता. अंबड, जि. जालना) – गावातील कृषी सेवा केंद्राच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक शेतकरी त्रस्त झाले असून खरीप हंगाम धोक्यात आला आहे. वेळेवर बियाणे, खते आणि कीडनाशके उपलब्ध न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर देखील संताप व्यक्त केला जात आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून सुखापूरी येथील कृषी सेवा केंद्राकडून शेतकऱ्यांना वेळेवर आणि आवश्यक ती खते-बियाणे मिळत नाहीत. “साठा संपला आहे”, “उद्या या”, “ऑर्डर आलेली नाही” अशी कारणे सांगत शेतकऱ्यांना वेळकाढूपणाची वागणूक दिली जाते. विशेष म्हणजे, काही शेतकऱ्यांना दोन बॅग घेतल्यावरच खत मिळेल, नाहीतर मिळणार नाही, असा अजब अटीनिशी मुजोर पवित्राही केंद्र चालवत असल्याचे आरोप आहेत.

यासोबतच, बाजारभावाच्या तुलनेत जास्त दराने खते विकण्याचे प्रकार घडत असून, शेतकऱ्यांना नको असलेली खते जबरदस्तीने दिली जात असल्याच्या तक्रारी आहेत. आणखी गंभीर बाब म्हणजे, विक्री करताना शेतकऱ्यांना अधिकृत चलन (पक्का बिल) न देता फक्त कोऱ्या कागदावर रकमेचा उल्लेख करून ‘कच्चा बिल’ दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे कोणताही अधिकृत पुरावा राहत नाही, आणि भविष्यात गैरव्यवहार सिद्ध करणे अशक्य होते.

स्थानिक शेतकरी किशोर कांबळे म्हणाले, “खतासाठी तीन वेळा कृषी केंद्रात गेलो पण प्रत्येक वेळी रिकाम्या हाताने परतावं लागलं. कुणालाच काही पडलेलं नाही.”

या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी केल्या असूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. संपर्क साधला असता, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी “आमच्याकडे अधिकार नाहीत, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे जा,” असे औपचारिक उत्तर दिले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांनी पुढील मागण्या केल्या आहेत:

कृषी सेवा केंद्राची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

खते, बियाणे आणि कीडनाशके योग्य वेळेत व योग्य दराने उपलब्ध करून द्यावीत.

तालुका कृषी अधिकारी बघ्याची भूमिका न घेता तातडीने पावले उचलावीत.

पक्के बिल देण्याचे बंधनकारक करावे, कच्च्या बिलाच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीला आळा घालावा.

शासनाने तत्काळ उपाययोजना न केल्यास शेतकरी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.

प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा
अंबड जिल्हा जालना प्रतिनिधी :रामकिशन अवधूत

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com