बदलापूर प्रतिनिधी – विजय धों. गायकवाड
बदलापूर शहरातील मांडली ते वाळिवली रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावर पडलेले मोठमोठे खड्डे ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष दत्ता बाळू गायकवाड यांनी कुंभारगांव बदलापूर नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, पुलावर पडलेले खड्डे हे वाहतुकीस धोका निर्माण करत असून, विशेषतः दुचाकीस्वार, वृद्ध व महिला प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
गंभीर बाब म्हणजे, याच मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणावर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होते. या खड्ड्यांमुळे विद्यार्थी अपघाताच्या धोक्यात सापडू शकतात.ठेकेदारावर कठोर कारवाईची मागणीगायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी केली आहे. तसेच, संबंधित ठेकेदाराची नगरपरिषदच्या ‘काळ्या यादी’त नोंद घेण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांनाही धोकानिवेदनात नमूद केल्याप्रमाणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा या खड्ड्यांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून रस्ता खड्डेमुक्त करावा, अन्यथा जनतेच्या सुरक्षेसाठी वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा