औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी : रितेश भाऊ साबळे .
जनुना दिः 09 जुलै 2025 .महा प्रजापती गौतमी बुद्ध विहार, जनुना येथे पंचशील नवयुग क्रीडा बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत व दररोज नियमितपणे शाळेतील इयत्ता १ ली ते 9 वी पर्यंतच्या सर्व समाजातील विद्यार्थ्यांसाठी मोफत ट्युशन क्लास सुरू करण्यात आले आहेत.

या ट्युशन वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना निस्वार्थीपणे शिक्षण दिले जाते. समाजातील तसेच गावातील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत पेन, पेन्सिल, वही व चॉकलेट यांचे वाटप दररोज करण्यात येते. विशेष म्हणजे, बाहेरगावी असलेले समाजबांधवसुद्धा आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटून उपक्रमात सहकार्य करत आहेत.
या वर्गांमध्ये केवळ शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कारही रुजवले जात आहेत. मुलांना स्टेज डेरिंग वाढवण्यासाठी त्यांना दोन शब्द भाषण शिकवले जाते, त्यांच्याकडून स्टेजवर बोलवून आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

विद्यार्थ्यांना दररोज खालील प्रमाणे प्रतिज्ञा म्हणायला लावली जाते:
– “मी हिंसा करणार नाही.”
– “मी चोरी करणार नाही.”
– “मी खोटं बोलणार नाही.”
– “प्रत्येक स्त्रीला मी माझी आई समजेन.”
– “मी दारू पिणार नाही.”

या ट्युशन वर्गांमध्ये विद्यार्थिनी स्वच्छतेची जबाबदारी स्वतः स्वीकारतात, परिसर स्वच्छ ठेवतात, व समाजासाठी आदर्श उदाहरण निर्माण करतात.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जनुना गावातील सर्व समाजबांधवांचे मोठे योगदान लाभले आहे. अशा प्रकारच्या कार्यामुळे समाजामध्ये शिक्षण व संस्कारांचे मूल्य वाढत असून, नव्या पिढीसाठी सकारात्मक दिशा मिळत आहे.
प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी :रितेश भाऊ साबळे .