माजलगाव, जिल्हा बीड | दिनांक : १० जुलै २०२५
माजलगाव पंचायत समिती अंतर्गत मागील एक महिन्यापासून थांबलेले घरकुल योजनांचे हप्ते अखेर लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा समावेश आहे.

निधीच्या विलंबामुळे अनेक लाभार्थ्यांची घरबांधणीची कामे अर्धवट अवस्थेत थांबली होती. या गंभीर समस्येकडे प्रकाशपर्व न्यूज ने लक्ष वेधले होते. दिनांक २ जुलै रोजी थांबलेल्या हप्त्यांबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर प्रकाशपर्व न्यूजच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पंचायत समिती प्रशासनाला जाग आली आणि कार्यवाही करत हप्ते खात्यात वर्ग करण्यात आले.
लाभार्थ्यांनी यामुळे समाधान व्यक्त केले असून प्रकाशपर्व न्यूज चे विशेष आभार मानले आहेत की, त्यांच्या आवाजाला बळ देऊन प्रशासनापर्यंत पोहोचवले गेले.
प्रकाशपर्व न्यूज
बीड जिल्हा प्रतिनिधी – राज वाघमारे