नांदेड प्रतिनिधी | प्रकाश गवारे
लातूर शहरातील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल ही शाळा ही इंग्रजी माध्यमात CBSE अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण देणारी आणि त्यासोबतच धम्म शिक्षण देणारी एकमेव बौद्ध शैक्षणिक संस्था म्हणून परिचित आहे. बौद्ध नगर, वैशाली बुद्ध विहार येथून संचालक आयु. शांतेश्वर सुरवसे यांनी १३ वर्षांपूर्वी या शाळेची स्थापना करून समाजपरिवर्तनाचा नवा अध्याय सुरू केला.

सध्या ही शाळा आनंद नगर येथील दिशा बँकेच्या शेजारील स्वतंत्र इमारतीत कार्यरत आहे. येथे नर्सरी (LKG, UKG) ते आठवीपर्यंत इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी येथे स्किल डेव्हलपमेंट साधने, मोठे खेळाचे मैदान, काळजीवाहू शिक्षकवर्ग, कमी फी आणि धार्मिक संस्कार यांचा उत्तम संगम साधला गेला आहे.धम्म शिक्षणाची वैशिष्ट्ये:त्रिशरण पंचशील, इंग्रजी २२ प्रतिज्ञा, आर्य अष्टांग मार्ग, दहा पारमिता, कुशल-अकुशल कर्म यांचे शैक्षणिक प्रशिक्षण नियमितपणे विद्यार्थ्यांना दिले जाते.

नवीन कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन उत्साहात पार पडलेदिनांक १४ जुलै २०२५ रोजी शाळेत नवीन कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.या कार्यक्रमात व्ही.एस. पँथर संघटनेचे प्रमुख मा. विनोद खटके, माजी नगरसेवक मा. सचिन मस्के, मा. विजयकुमार मस्के, मुख्याध्यापक प्रा. रवींद्र राजेगावकर, संचालक प्रा. शांतेश्वर सुरवसे आणि भिक्खु बोधीराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या वेळी मा. विनोद खटके यांनी आपल्या भाषणात शाळेच्या कार्याची प्रशंसा करत शाळेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
पालकांसाठी आवाहन:
सामान्य कुटुंबातील मुलांना नाममात्र शुल्कात दर्जेदार इंग्रजी शिक्षण आणि बौद्ध संस्कार देणारी ही शाळा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.
शाळेला प्रत्यक्ष भेट द्या, प्रगतीपत्रक पहा आणि समाधान झाल्यास आपल्या पाल्याचा प्रवेश जरूर घ्या!