सोलापूर (प्रतिनिधी)वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आणि होलार समाजाचे नेतृत्व करणारे तुकाराम पारसे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या जाण्याने पारसे कुटुंबावर मोठा आघात झाला असतानाच, वंचित बहुजन आघाडीने त्यांना मानसिक व आर्थिक आधार दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीची जबाबदारीपूर्ण भूमिकावंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ. नितीन ढेपे यांनी तुकाराम पारसे यांच्या कुटुंबीयांची तातडीने भेट घेतली आणि त्यांच्या मुलाच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या मुलाला सोलापूर येथील एका सोलार कंपनीत नोकरीसाठी नियुक्ती मिळवून देण्यात आली असून, लवकरच त्याचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.तसेच, पारसे यांच्या मुलीने नुकताच L.L.B CET परीक्षा उत्तीर्ण केली असून, तिच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी वंचित बहुजन आघाडी सोलापूरच्या वतीने उचलण्यात आली आहे.

पदाधिकाऱ्यांची भेट व आश्वासनया पार्श्वभूमीवर पारसे कुटुंबाने डॉ. नितीन ढेपे यांची भेट घेतली. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, महासचिव विनोद इंगळे, तसेच विक्रांत गायकवाड, अनिरुद्ध वाघमारे, शाहीद शेख, रवी थोरात, आनंद वाघमारे हे पदाधिकारी उपस्थित होते.
या सगळ्या उपक्रमातून वंचित बहुजन आघाडीचा सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन अधोरेखित होतो आहे. दुःखाच्या या काळात तुकाराम पारसे यांच्या कुटुंबाला दिलासा देण्याचे काम वंचित बहुजन आघाडीने प्रभावीपणे पार पाडले आहे.

🕊️ पारसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🗣️ आणि कुटुंबासाठी एकजूट आणि आधाराचे प्रतिक ठरलेली वंचित बहुजन आघाडी!