
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ व माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यातील राजकीय आरोप व प्रत्यारोप हा गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणातील चर्चेचा विषय ठरत आहे
दरम्यान पत्रकार परिषदेत इम्तियाज जलीलांनी हरिजन या शब्दाचा वापर केला यामुळे समाजभावना दुखावून काही पोलिस स्टेशन मध्ये त्यांच्यांवर ॲट्रासिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करण्यात आले, फक्त गुन्हे दाखल न करता त्यांनां अटक करण्यात यावी या मागणीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर अत्याचार विरोधी कृती समिती तर्फे पत्रकार परिषद संपन्न झाली
यामध्ये सोमवार 23 जून रोजी संभाजीनगर औरंगाबाद शहरात इम्तियाज जलील यांना अटकेच्या मागणीसाठी मोर्चा निघणार आहे याची सविस्तर माहिती देण्यात आली
या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक भिमयौध्दा भाऊ भुईगळ, अरुण बोर्डे, दौलत खरात , विनोद बनकर, सतिश पट्टेकर व इतर उपस्थित होते