5.3 C
New York

Buy now

spot_img

नागपूर: अंकित फार्मा कंपनीत स्फोट, एक ठार – पाच जखमी

Oplus_131072


नागपूर: अंकित फार्मा कंपनीत स्फोट, एक ठार – पाच जखमी

नागपूर (१७ जून): शहरातील अंकित फार्मा कंपनीमध्ये आज सकाळी सुमारे ११ वाजता अचानक स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एक कामगार जागीच ठार झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरून गेला. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. प्राथमिक माहितीनुसार, स्फोट रासायनिक प्रक्रियेवेळी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून तपास सुरू असून कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

– दीपक हिवराळे, प्रतिनिधी, बुलढाणा जिल्हा


Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com