19.5 C
New York
सोमवार, जून 16, 2025

Buy now

spot_img

विविध सामाजिक संघटनांच्या वतीने ॲड. अमोल सोनवणे यांचा गौरव

🌟 प्रकाशपर्व न्यूज 🌟

📍 श्रीरामपूर

श्रीरामपूर येथील विद्रोही विद्यार्थी संघटनेचे ॲड. अमोल सोनवणे यांचा विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या त्रिसूत्रीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत कठीण परिस्थितीतही आपले शिक्षण पूर्ण करत खासदार गोविंदराव आदिक विधी महाविद्यालय, श्रीरामपूर येथून कायद्याची पदवी मिळवली. त्यांच्या या प्रेरणादायी वाटचालीचा गौरव लुंबिनी बुद्ध विहार, श्रीरामपूर येथे करण्यात आला.

🪔 या गौरव सोहळ्याला विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी ॲड. सोनवणे यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

🌼 प्रमुख मान्यवरांची उपस्थिती:

अशोकराव दिवे – शंभुक वसतिगृह

सुनील वाघमारे – वं. ब. यू. आ. जि. महासचिव

रमेश मकासरे, फ्रान्सिस शेळके, सर्जेराव देवरे – बामसेफ

सुगंधराव इंगळे, प्रकाश सावंत, के. सी. दाभाडे, निवृत्ती पगारे,

भाऊसाहेब हिवराळे – भारतीय बौद्ध महासभा

डॉ. सलीम शेख, अकबर शेख, विजय जगताप – विद्रोही सांस्कृतिक चळवळ

जीवनराव सुरुडे – भारतीय कम्युनिस्ट पक्ष

मेजर कृष्णा सरदार, संभाजी कोळगे, डॉ. संजय दुशिंग – परिवर्तन फाउंडेशन

रामभाऊ सुगुर – श्रीराम ट्रेडर्स

कवी रज्जाक शेख, कवी आनंद साळवे

सुशिल पठारे, अमोल मिसाळ – सक्षम फाउंडेशन

कैलास खंदारे – नामदेव शिंपी समाज पंच मंडळ

मुश्ताकभाई तांबोळी – मुख्य संपादक, राजमुद्रा वृत्त वाहिनी

ॲड. राजेश बोर्डे, के. टी. साळवे, एफ. एन. वाघमारे,

गौतम राऊत – सामाजिक कार्यकर्ते

🎤 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन – अशोकराव दिवे🙏 आभार प्रदर्शन – सुशिल पठारे

📌 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष त्रिभुवन, विजय जगताप, पी. डी. सावंत, के. सी. दाभाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

🗣️ प्रकाशपर्व न्यूज कडून ॲड. अमोल सोनवणे यांना पुढील कार्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com