19.5 C
New York
सोमवार, जून 16, 2025

Buy now

spot_img

लखमापुरी शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात – विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश व बूट-सॉक्स वाटप

रामकिसन अवधूत
प्रकाशपर्व न्यूज, अंबड तालुका

लखमापुरी (ता. अंबड, जि. जालना) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे आगमन उत्साही वातावरणात झाले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश, तसेच बूट आणि सॉक्सचे वाटप करण्यात आले. शालेय जीवनाच्या प्रारंभीच आवश्यक साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल झालेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन जंगी स्वागत करण्यात आले. या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आत्मीयता निर्माण झाली असून, पालकांनीही समाधान व्यक्त करत शाळेच्या नियोजनाचे कौतुक केले.

या उपक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीने अगोदरच काटेकोर नियोजन केले होते, त्यामुळे कोणत्याही अडचणीशिवाय सर्व विद्यार्थ्यांना वेळेत साहित्य मिळाले. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की,

“सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी, त्यांच्यात आत्मविश्वास वाढावा, शिक्षणात रस निर्माण व्हावा व त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी,” हा उद्देश समोर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी लखमापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. ज्ञानेश्वर तारगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अतुल गाडे, उपाध्यक्ष श्री. रवी कांबळे, मुख्याध्यापक श्री. नाथजोगी सर, तसेच रामकिसन अवधूत, नवनाथ मराठे, परमेश्वर महागोविंद, अनिल कांबळे, सुखदेव कासार, भरत शिंदे, शिक्षक श्री. खरमाटे सर व शेळके मॅडम उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व आनंददायी वातावरणात पार पडला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन शैक्षणिक वाटचालीसाठी ही सकारात्मक सुरुवात महत्त्वाची ठरणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com