

नांदेड प्रतिनिधी :-धम्मानंद कांबळे
दि. 8 जुलै :-वाशिम- मंगरूळपीर तालुक्यातील लही कुंभी गावात विकी ठोंबरे या दलित युवकावर १५ जून रोजी लोखंडी साखळी, दंड व फावड्याने अमानवी अत्याचार करण्यात आला. आसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडूनही एक महिना उलटून गेला, तरी आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत.
या प्रकरणी BNS कलम 109, 3(5) तसेच SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3(2)(va), 3(1)(r) अंतर्गत गुन्हा दाखल झाला असला तरी, अटक झालेली नाही. उलट पीडित कुटुंबाला पोलिसांनी चौकशीच्या नावाखाली त्रास दिल्याचा आरोप आहे. यामुळे स्थानिक स्तरावर संताप व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर सम्राट अशोक सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष आकाश दादा शिरसाट यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. त्यांनी प्रशासनास इशारा दिला आहे की, “जर तातडीने कारवाई झाली नाही, तर हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजवले जाईल. पोलिसांचे दरवाजे बंद असतील, तरी न्यायालयाचे दरवाजे आम्हाला खुले आहेत.
“सेनेच्या मागण्या:पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षणआरोपींना तात्काळ अटकविशेष न्यायालय व जिल्हा दक्षता समिती स्थापननुकसान भरपाईची तरतूदआरोपींना जामीन मिळू न देण्यासाठी प्रयत्नमुख्यमंत्र्यांनी आणि SC/ST आयोगाने दखल घ्यावीघटनेतील गंभीरता पाहता कारवाईचा विलंब प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आहे.
प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा