-2.7 C
New York

Buy now

spot_img

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, बाभळगाव — आदर्श शाळा पुरस्काराने गौरवित

प्रतिनिधि = राज वाघमारे प्रकाशपर्व

दिनांक 14 सप्टेंबर 2025 ( बाभळगाव )

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, बाभळगाव या शाळेची मानवत व पाथरी या दोन तालुक्यांमधून आदर्श शाळा म्हणून निवड करण्यात आली असून, तिला प्रथम क्रमांकाचा मान मिळाला आहे. ही निवड शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रमशीलता, शाळेतील स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम व शिक्षक-पालक सहभाग अशा विविध निकषांवर आधारित करण्यात आली आहे.

या यशाचा गौरव करताना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर सहकारी पतसंस्था मर्यादित, पाथरी यांच्या वतीने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा शिक्षक कॉलनी, हनुमान मंदिर, पाथरी येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षकगण, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शा.व्य. समिती बाभळगाव व गावातील पालकांनी शाळेच्या यशाचा आनंद साजरा केला.

या यशामध्ये सर्व शिक्षकांचे, शाळा व्यवस्थापन समितीचे तसेच पालकांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या सहकार्यामुळेच हे घवघवीत यश मिळवता आले असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.

शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व शिक्षकगण, शालेय व्यवस्थापन समिती व पालक वर्गांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com