-2.7 C
New York

Buy now

spot_img

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य उदगीर शहराध्यक्ष पदी सरदार शेख यांची निवड

प्रकाशपर्व न्युज पोर्टल – धम्मपाल शिंदे पुणे व लातूर जिल्हा प्रतिनिधी

उदगीर (जि. लातूर) – अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्याच्या उदगीर शहराध्यक्ष पदी सरदार शेख यांची निवड करण्यात आली आहे.

दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी ही निवड जाहीर करून सरदार शेख यांना नियुक्तीपत्र प्रदान केले

.संस्थेच्या कार्याबाबत बोलताना अध्यक्ष सौदागर महमदरफी म्हणाले की, महाराष्ट्रात माहिती अधिकार, मानवी हक्क, पत्रकार संरक्षण, भ्रष्टाचार निर्मूलन, ग्राहक संरक्षण आदी क्षेत्रांत प्रभावीपणे काम केले जाणार आहे. तसेच नागरिकांना आणि शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येईल.

पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले याविरोधात संघटितपणे लढा दिला जाणार आहे. भ्रष्ट नोकरशाहीचा पर्दाफाश करून पारदर्शकता निर्माण करण्यासाठी समिती प्रयत्नशील राहणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय तसेच सरकारी कामकाजात होणाऱ्या भ्रष्टाचाराविरोधात तक्रार, उपोषण व आंदोलन यांसारखे उपाय योजले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.सरदार शेख यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com