प्रतिनिधी -रामकिसन अवधूत
सुखापुरी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे उस, कापूस आणि सोयाबीन ही पिके पाण्यात बुडून शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

सुखापुरी, लखमापुरी, रेवलगाव, वडीकाळ्या, कुक्कडगाव, बेलगाव आणि करंजाळा या गावांमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
लखमापुरी : शेतकरी कुमार रामकिसन गाडे यांच्या कापूस पिकात पाणी साचले.

वडीकाळ्या : विक्रम गव्हाणे, नकुल तनपुरे, ज्ञानेश्वर गव्हाणे व रामकिसन पाचफुले यांच्या उसाच्या पिकाचे मोठे नुकसान.
लखमापुरी : शेतकरी संदीप गोरे यांच्या कापूस व उसाच्या शेतात पाणी शिरल्याने पिके धोक्यात.

या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. स्थानिक प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

प्रतिनीधी- रामकिशन अवधुत



