प्रकाशपर्व न्यूज कल्याण प्रतिनिधी : प्रदीप जाधव
दिनांक 17/09/2025 नांदेड : वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अखेर प्रशासन जागे झाले आहे. पूरग्रस्तांना मंजूर झालेली आर्थिक मदत तत्काळ देण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषण सुरू राहील, असा ठाम इशारा त्यांनी दिला होता.

या आंदोलनानंतर प्रशासनाने हालचाल केली असून अखेर पूरग्रस्तांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.एकूण १४,८८५ पात्र पूरग्रस्तांना नुकसानभरपाईची रक्कम लवकरात लवकर मिळावी, हीच सर्वांची अपेक्षा आहे.
पूरग्रस्तांना मदत मिळायला सुरुवात झाल्यामुळे लोकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे.




