बल्लारपूर – वंचित बहुजन आघाडी व महिला आघाडी बल्लारपूर शहराच्या वतीने दिनांक ७ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर जोरदार “आक्रोश मोर्चा” काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व शहराध्यक्ष उमेश कडू यांनी केले, तर सूत्रसंचालन महिला शहराध्यक्ष रेखाताई पागडे यांनी केले.

मोर्चाच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना २४ तास स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, सरसकट सरासरी बिल आकारणी करण्यात यावी, तसेच एक वर्षासाठी अभययोजना राबविण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. शहरातील पाणी अशुद्ध व गढूळ स्वरूपात येत असून, अनावश्यक व अवास्तव पाणीबिलांमुळे नागरिक त्रस्त असल्याने नागरिकांत तीव्र संताप निर्माण झाला आहे.या वेळी उमेश कडू यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट इशारा दिला की, “पंधरा दिवसांच्या आत जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर ग्राहक न्यायालयाच्या माध्यमातून लढा उभारण्यात येईल.”या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने १५ जुलै रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गेटसमोर “तक्रार संकलन शिबीर” आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभागातील नागरिकांना या शिबिराची माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

या वेळी प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी कटके सर यांना निवेदन देण्यात आले. कार्यक्रमाचे आभार कोषाध्यक्ष प्रभू दाजी देवगड यांनी मानले.कार्यक्रमाला महासचिव गौतम रामटेके, संघटक राकेश पेटकर, प्रियंकेश शिंगाडे, किरण रामटेके, नम्रता साव, सविता थुलकर, पंचावेले, प्रतिमा खेकारे, देवराम नंदेश्वर, परमानंद भडके, अशोक भावे आदी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
.प्रकाश पर्व न्यूज आवाज वंचित बहुजनांचा
चंद्रपूर प्रतिनिधी : डॉ. बाळासाहेब बन्सोड सर