19.5 C
New York
सोमवार, जून 16, 2025

Buy now

spot_img

प्रकाश पर्व कार्यशाळेत संपन्न झाले प्रभावी मार्गदर्शनाचे सत्र

सुरत | दि. 15 जून 2025

औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी : रितेश साबळे

प्रकाश पर्व न्यूजच्या वतीने सुरत येथे काल एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला विविध भागांतील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये माध्यम क्षेत्रातील अनेक नवोदित आणि कार्यरत पत्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यशाळेच्या मुख्य आकर्षणाचे केंद्र ठरले मुख्य संपादक साहेबांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. त्यांनी प्रतिनिधींना मीडिया क्षेत्रातील जबाबदाऱ्या, सत्याशी बांधिलकी, आणि सामाजिक जाणीव यांची सखोल जाणीव करून दिली. त्यांच्या ओघवत्या शैलीतून आलेले विचार प्रतिनिधींच्या मनावर प्रभाव टाकणारे ठरले. मुख्य संपादक मा . अजय जाधव सर यांनी सर्वांचे स्वागत केले व आभार व्यक्त करून अनेक प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .

कार्यशाळेत मीडिया क्षेत्रातील आव्हाने, सत्य पत्रकारितेचे महत्त्व, आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर या विषयांवर सखोल चर्चा झाली. प्रतिनिधींनी यावेळी आपले अनुभव, प्रश्न आणि शंका मांडत कार्यशाळेला अधिक अर्थपूर्ण बनवले.

प्रकाश पर्व न्यूजच्या या उपक्रमामुळे प्रतिनिधींमध्ये नवचैतन्य आणि प्रेरणा निर्माण झाली असून भविष्यकाळातील वाटचालीसाठी ही कार्यशाळा एक मजबूत पायाभरणी ठरणार असल्याचे सर्वांनी नमूद केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com